SHRUNGAR MARATHI BHASHECHA
AAMACHI MARATHI BHASHA HAMARI MARATHI BHASHA OUR MARATHI LANGUAGE ..भरजरी कपडे अन् सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच ! 😃 आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते❗ म्हणूनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही, तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात.' 👌👌👌👌👌👌👌 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदींचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली....। कुणी लिहिली हे कदाचित विकीपीडियालाच ठाऊक असेल. वाचाच, मस्त आहे. 🌹*शृंगार मराठीचा*❗ _*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते भाळी सौदामिनी | _*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके सुंदर तव कानी | नाकावरती _*स्वल्पविरामी*_ शोभे तव नथनी | _*काना*_-काना गुंफुनी माला खुलवी तुज मानिनी | _*वेलांटी*_चा पदर शोभे तुझीया माथ्याला | _*मात्रां*_चा मग सुवर्णचाफा वेणीवर माळला | _*उद्गारा*_चा तो गे छल्ला लटके कमरेला | _*अवतरणां*_च्या बटा मनोहर भावती चेहर्याला | _*उ*_काराचे पैंजण झुमझुम पदकमलांच्यावरी | _*पूर्णविरामी*_ तिल...