KHUPACH SUNDAR KAVITA
*खुपच सुंदर रचना.. जीवन शास्त्र सांगीतले आहे या कवितेत... त्या अज्ञात कवीला दिलसे सलाम!*
*ज्याने कोणी ही रचली आहे त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद...!!*
*💐💐🙏🙏*
*ह्याला आयुष्य म्हणावं काय ??*
👇👇
*पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिध्दी,*
*लोळण घेतात पायात.*
*बिल गेटची पत्नी तरीही*
*का घटस्फोट घेते ह्या वयात ?*
*शिक्षणाने माणूस समृध्द होतो*
*आम्ही आहोत अजूनही भ्रमात*
*उच्चविद्याविभूषकांचे मायबाप*
*मग का असतात वृध्दाश्रमात ?*
*हा डिप्रेशनचा शिकार*
*तो आत्महत्या करतो*
*ज्याला समजावं सेलिब्रिटी*
*तो एकाकीपणात मरतो*
*ज्यांनी कमावलं नाव*
*त्याला आनंद का मिळत नाही ?*
*काय चाटायचं ह्या मोठेपणाला*
*नातं आपुलकीचं जुळत नाही.*
*जळजळीत वास्तव सांगतो*
*तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही*
*गरीब, आडाणी, प्रामाणिक मजूरांचे*
*मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही*
*असं नाही त्यांचे घरात*
*नाहीत वादविवाद*
*पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम*
*बोटावर मोजण्या एवढे अपवाद*
*आजारी मायबापांचा ईलाज*
*करतात किडूक मिडूक विकून*
*पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी*
*नाळ ठेवली आहे टिकवून*
*व्यसनी, रागीट, नवरा*
*त्याला गरीबीची जोड*
*तरीही त्याची पत्नी बिच्चारी*
*करतेच ना तडजोड ?*
*दु:ख हलकं करतात*
*एकमेकांना भेटून*
*एका शिळ्या भाकरीचा तुकडा*
*खातात सारेजण वाटून*
*जेवढी लावतात माया*
*तेवढंच बोलतात फाडफाड*
*कितीदा तरी भांडतात*
*पण कुठे येतो ईगो आड ?*
*ऊशाशी दगड घेऊन*
*भर ऊन्हातही झोपी जातो*
*काळ्या मातीत घाम गाळणारा*
*बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?*
*ना तोल ढळतो ना संयम*
*दु:खातही सावरण्याची आस*
*कारण अजूनही ह्या माणसांचा*
*आहे माणूसकीवर विश्वास.*
*पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे*
*आले हे दळभद्री दिवस*
*देव सुध्दा लगेच बदलतात*
*जर पावला नाही नवस.*
*एकत्रीत कुटूंब हल्ली*
*सांगा कुणाला हवं ?*
*कामा शिवाय वाटतं का*
*आपण कुणाच्या घरी जावं ?*
*एकदा तरी बघा जरा*
*आपल्या आयुष्याचा रोड मॅप*
*कुणाचं कुणाशी पटत नाही*
*काय तर म्हणे जनरेशन गॅप*
*सांगा बरं कुणावर ह्या*
*विकृत विचारांचा पगडा नाही*
*घर, बंगला, फ्लॅट असु द्या*
*दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही.*
*बहूत अच्छे, बहूत खुब !*
*क्या बात है ? बहूत बढीया !*
*एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया*
*जागृत चोवीस तास सोशल मिडीया*
*आभासी दुनियेची चाले*
*कोरडी कोरडी ख्याली खुशाली*
*मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा*
*मोबाईलवरच श्रध्दांजली !*
*काय बरोबर ? काय चूक ?*
*मत मांडण्याचीही सत्ता नाही*
*तो बंद घरात मरून पडला*
*वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही !*
*मुलं पाठवले परदेशात*
*आई संगे म्हातारा बाप कण्हतो*
*अंत्यविधी उरकून घ्या*
*पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो*
*लेकराला पाॅकेटमनी, बाईक*
*अन् भलेही दिली जरी कार*
*किती छान झालं असतं*
*जर दिले असते संस्कार ?*
*होस्टेल, बोर्डींगात बालपणीच पाठवलं*
*तो तुम्हाला का वागवणार ?*
*जमीन असो की जिवन*
*येथे जे पेरलं तेच ऊगवणार.*
*जिवशास्र शिकवलं*
*जिवनशास्त्र शिकवा*
*चुलीत गेली चित्रकला*
*सांगा चारित्र्याला टीकवा.*
*त्रिकोण, चौकोन, षट्कोन*
*ह्याला सांगा विचारेल कोण ?*
*ज्याचे जवळ नसेल*
*आयुष्याचा दृष्टीकोन*
*विपरीत परिस्थीतीतही*
*जपणूक केली पाहीजे तत्वाची*
*व्याकरणापेक्षाही अंत:करणाची*
*भाषा असते महत्वाची.*
*चुकू द्या चुकलं तर*
*अंकगणित अन् बीजगणित*
*माणसांची बेरीज करा*
*गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित*
*प्राणपणाने जतन करावे*
*नाते शहर, खेडे, गावाचे*
*मेल्यावरती खांदा द्यायला*
*असावे चारचौघे जिवाभावाचे*
*मेल्यावर दोन अश्रू*
*हीच आयुष्याची कमाई*
*ज्याने हे कमावलं नसेल*
*तो आयुष्य जगलाच नाही !*
*मिळून मिसळून वागावं*
*आनंदानं छान जगावं*
*तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं*
*म्या पामरानं काय सांगावं ?*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
Comments
Post a Comment